संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सीबीएसई बोर्डाची इयत्ता १२वीची परीक्षा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव आणि राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष आणि भागधारक यांच्यासोबत आज एक उच्चस्तरीय आभासी बैठकी संपन्न झाली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’, केंद्रीय महिला आणि बालकल्याण स्मृती झुबीन इराणी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची सुरक्षितता आणि सुरक्षा विचारात घेऊन, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई, परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात पर्याय शोधत आहेत. परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाचा उच्च शिक्षण संस्थांशी विचारविनिमय सुरु असल्याचे पोखरियाल यांनी सांगितले.
कोरोना संकटाचा शिक्षण क्षेत्रासह विशेषत: बोर्डाच्या परीक्षा आणि प्रवेश परीक्षेसह विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता, जवळपास सर्व राज्य शिक्षण मंडळे, सीबीएसई आणि आयसीएसई यांनी २०२१ च्या इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आणि राष्ट्रीय परीक्षा घेणार्या अन्य संस्थांनीही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याचा परिणाम राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षा आणि देशभरातील इतर प्रवेश परीक्षांवर होतो. यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये असलेली अनिश्चितता दूर करण्यासाठी, देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध राज्य सरकारांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर इयत्ता बारावीच्या सीबीएसई परीक्षांविषयी निर्णय विचारात घेणे योग्य आहे, अशी चर्चा या बैठकीत झाली.
सर्व राज्य सरकारांनी १२वीच्या परीक्षेबाबतच्या सर्व सूचना येत्या २५ मे पर्यंत द्याव्यात. सीबीएसई १२वी बोर्डाची परीक्षा ही जुलैमध्ये होण्याची शक्यता असून त्याचे सविस्तर वेळापत्रक शिक्षणमंत्री पोखरियाल हे येत्या १ जून रोजी जाहिर करणार आहेत. तसे बैठकीत निश्चित करण्यात आले.
The meeting with other states on Class 12th board exams was fruitful as we received immensely valuable suggestions. I have requested the State Governments to send me their detailed suggestions by May 25th: Union Education Minister Ramesh Pokhriyal Nishank
(File pic) pic.twitter.com/kZUvgNe6fT
— ANI (@ANI) May 23, 2021