नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळ्यामधून काळ्या बाजारात विक्रीस नेण्यात येणाऱ्या रेशन वरील तांदूळ व गव्हाचा मोठा नाशिक जिल्हा ग्रामिण पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सापळा रचून ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई- आग्रा महामार्गावरील उमराणे गावाजवळ एका ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून पोलिसांनी २४६ गोणी तांदूळ व ३० गोणी गहू असा सुमारे ११ लाख ९७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
ट्रकचालकांसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात जीवनाश्यक वस्तू कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ,पोलीस अधिक तपास करीत आहे.