विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्य बोर्डाची इयत्ता १२वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई)ने इयत्ता १२वाच परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. याच धर्तीवर राज्य बोर्डाचीही परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. परीक्षा रद्द करण्यासंदर्भातील प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. या बैठकीत आज अंतिम निर्णय घेण्यात आला.
कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करायचे, निकाल कसा लावायचा आणि पुढील प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाणार यासंदर्भात आता चर्चा सुरू झाली आहे.