सांगली – येथील सांगलीवाडी येथे तब्बल १२ फुटी मगरीला पकडण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. महत्प्रयासानंतर या मगरीला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला वनविभागाच्या हवाली करण्यात आले आहे. कृष्णा नदी पत्रात मोठ्या प्रमाणात मगर आहेत. गेल्या काही दिवसांपासून या भागात अतिवृष्टी आणि महापुराने हाहाकार माजविला. महापुरामुळेच कृष्णेतील मगर इतरत्र गेल्याचे सांगितले जात आहे. त्यातीलच ही एक मगर असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/ANI/status/1420544732778831877