मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता एसएससी बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद् करण्याचा
निर्णय शासनाने घेतला आहे. या परीक्षा रद्द केल्यामुळे त्यांचे परीक्षा शुल्कही विद्यार्थ्यांना परत करा अशी मागणी छात्र भारतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
एसएससी बोर्डात यावर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरून प्रवेश निश्चित केला होता. कोरोनाची परिस्थिती व त्यामुळे सर्वसामान्यांवर आलेली आर्थिक अडचण शासन जाणून आहे. तरी कृपया दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत तर परीक्षा शुल्कही विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी छात्र भारतीने केली आहे. या पत्रावर छात्रभारतीचे अध्यक्ष रोहित ढाले, यांच्यासह सचिन बनसोडे, दिपाली आंब्रे, अमरीन मोगर, विकास पटेकर, सचिन काकड, समीर कांबळे, यांच्या सह्या आहेत.