मुंबई – ऐकायला जरा विचित्र वाटेल पण एका शंभरी पार केलेल्या संताच्या ह्रदयाची धडकन ऐकून डॉक्टरांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाराजांचे वय शंभरीपार असले तरीही त्यांचे ह्रदय एखाद्या २५ वर्षाच्या तरुणासारखे आहे. त्यांना ना मधुमेह आहे, ना रक्तदाबाचा त्रास आहे. पण त्यांच्या या फिटनेसचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
काही दिवासांपूर्वी रात्री त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे ह्रदयरोगतज्ज्ञांनी त्यांना तपासले. तेव्हा त्यांना महाराजांचे ह्रदय एखाद्या तरुणाच्या ह्रदयासारखे एक्टीव्ह असल्याचे आढळले. उत्तरप्रदेशातील सिंधोली तालुक्यात राहणारे चंद्रिका प्रसाद मिश्रा उर्फ मौनी महाराज यांचा जन्म १८९० ला झाला. त्यांच्या आधार कार्डवरही जन्माचे हेच वर्ष आहे. वयाच्या दहा वर्षांनंतर त्यांनी तपश्चर्या सुरू केली. कमी वयातच त्यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथला जाऊन तपश्चर्या केली, असे त्यांच्या जीवन परिचयात लिहीले आहे.
बुंदेलखंडसह देशभरात त्यांचे भक्त आहेत. सुरुवातीपासून ते सात्विक जीवन जगत आहेत. १३१ वर्षे वय असूनही त्यांना कुठलाही कायमस्वरुपी आजार जडलेला नाही. काही दिवसांपूर्वी त्रास झाला म्हणून डॉक्टरांकडे नेले तर त्यांचे वय ऐकून डॉक्टरांच्या भूवयाच उंचावल्या. त्यानंतर त्यांची एंजिओग्राफी करण्यात आली तर ह्रदयातील प्रत्येक गोष्ट जागेवर असल्याचे लक्षात आले. ते दररोज ब्रह्म मुहूर्ताला उठतात आणि शुद्ध हवा घेतात. दररोज शुद्ध पाणी पितात. व्यायामाचा एकही दिवस सुटलेला नाही.