नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १०० कोटींना राज्यसभेची जागा मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या हवाल्याने माध्यमांनी ही बातमी दिली आहे. त्यांनी सांगितले की सीबीआयने पैशाच्या व्यवहारापूर्वी आरोपीला पकडले. एवढेच नाही तर आरोपीने त्यांना १०० कोटींच्या बदल्यात गव्हर्नर बनवण्याची ऑफरही दिली होती.
अहवालानुसार, या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, सीबीआय अधिकारी गेल्या काही आठवड्यांपासून फोन इंटरसेप्टद्वारे कॉल ऐकत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची नजर आरोपीवर होती.या प्रकरणात सीबीआयने चारहून अधिक जणांना आरोपी केले आहे. महाराष्ट्रातील रहिवासी कमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकचा रहिवासी रवींद्र विठ्ठल नाईक, महेंद्र पाल अरोरा आणि दिल्लीचा रहिवासी अभिषेक बुरा अशी यातील काहींची नावे आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे लोक राज्यसभेत जागा व्यवस्था, राज्यपाल किंवा सरकारी संस्था, मंत्रालये आणि विभागांचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याची आश्वासने देत असत. त्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची मागणी करत असत.
100 Crore Gang Rajyasabha Seat Governor Post CBI Action