डांगसौंदाणे – येथील प्रसिद्ध मसाला व्यापारी दिगंबर महादु भदाणे (भाऊ मसलेवाले ) यांच्यातर्फे डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयातील (कोविड केअर सेंटर) मधील रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी १२०० पाणी बॉटल(१०० बॉक्स) चे वाटप करण्यात आले.
डांगसौंदाणे येथील प्रतिष्ठित व्यापारी दिगंबर महादू भदाणे यांनी आपल्या दातृत्वातुन आज डांगसौंदाने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णासाठी व तेथे आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शंभर पाणी बॉक्स देऊन आपले दातृत्व सिद्ध केले आहे आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान भाऊंनी रुग्णालयासाठी आणि तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी पाणी बॉक्स देण्याची इच्छा व्यक्त केली. याबाबत तात्काळ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश चौरे यांना याबाबत कल्पना देऊन सदर पाणी बॉक्स तात्काळ आपल्या रुग्णालयात येत असल्याची माहिती दिली. गावातील तरुण व्यापारी स्वप्निल चिंचोरे यांनी तात्काळ रुग्णालयात १०० बॉक्स पोहच केले. रुग्णालय प्रशासनाला भाऊ यांचे लहान चिरंजीव किरण भदाणे यांनी या पाणी बॉक्सचे वाटप करून या पुढेही रुग्णालयाला पाण्याची आवश्यकता भासल्यास मदत्त करण्याचा शब्द दिला. रुग्णालय प्रशासनने भदाणे कुटुंबियांचे आभार मानले. गावातील दानशूर व्यक्ती किंवा संघटनांनी मदत केली तरी रुग्णांना आधार मिळतो असे डॉ चौरे यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासन आरोग्य कर्मचारी सतत रुग्णांची काळजी घेत असून जास्तीत जास्त रुग्णांना आहार व औषधे वेळेवर कसे देता येतील यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी मेहनत घेत असल्याचे डॉ चौरे यांनी सांगितले. या वेळी जेष्ठ पत्रकार हेमंतदादा चंद्रात्रे, पत्रकार निलेश गौतम, किरण भदाणे, रुग्णालयातील आरोग्य स्टाफच्या बोरसे मॅडम, लॅब टेक्नीशीयन हर्षद सोनवणे, संतोष दुसाने स्वप्नील चिंचोरे विशाल नेरकर आदी उपस्थित होते.