इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. मंगळवार उद्या १३ मे रोजी दुपारी १ वाजता दहावीचा निकाल लागणार आहे. काही दिवसापूर्वीच बारावीचा निकाल लागला. त्यानंतर आता दहावीचा निकाल लागणार आहे.
या निकालाचे जवळपास सर्वच काम पूर्ण झाले आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल.