मुंबई – राज्याचा दहावीचा ९६.९४ टक्के निकाल लागला असून त्यात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.९६ टक्के तर मुलांचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. बारावीच्या निकालातही मुलींनी बाजी मारली होती. राज्याच्या निकालात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे.
कोकण: ९९.२७ टक्के
कोल्हापूर: ९८.५० टक्के
लातूर: ९७.२७ टक्के
नागपूर: ९७ टक्के
पुणे: ९६.९६टक्के
मुंबई: ९६.९४ टक्के
अमरावती: ९६.८१ टक्के
औरंगाबाद: ९६.३३ टक्के
नाशिक: ९५.९० टक्के
दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
दुपारी १ वाजता खालील लिंकवर पहा निकाल
www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in