मुंबई – येत्या ८ मार्चपासून राज्यात सुरू होणाऱ्या एबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मोठी स्पष्टता आली आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार नाहीत. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली जात होती. मात्र, या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. तशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि विद्यापीठाकडे अनेकांनी पत्रव्यवहार केला होता. मागणी केली होती. मात्र, अनेक ठिकाणी इंटरनेटसह अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नसल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे. परिणामी, या परीक्षांची स्पष्टता आल्याने आता विद्यार्थी आणि पालकांचा जीव भांड्यात पडला असून विद्यार्थी आता त्या त्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देऊ शकणार आहेत.