मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या ८ ते १० दिवसांत परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल, त्यानंतर टाळेबंदीबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. दिवाळीनंतर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असून हिवाळ्यात आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी आम्ही संबधीत विभागांशी बोलत आहोत. त्यानंतर निर्णय घेऊ. नागरिक पॅनिक होतील असे मी बोलणार नाही असे त्यांनी सांगितले.