नवी दिल्ली – पहिल्या नजरेत झालेले पहिले प्रेम कधी न विसरणे आणि अनेक वर्षांनतर तिचे पुन्हा आयुष्यात परतणे हे दृष्य आपण फक्त चित्रपटातच पाहतो. परंतु जैसलमेरच्या कुलथरामध्ये ही गोष्ट खरी ठरली आहे.
८२ वर्षीय चौकीदारांला ५० वर्षांपूर्वीचे पहिले प्रेम पुन्हा मिळाले आहे. ७० च्या दशकात जैसलमेरमध्ये फिरायला आलेली ऑस्ट्रेलियाची युवती मरिना त्यांना “आय लव्ह यू” म्हणून पुन्हा आपल्या देशात परतली. आता त्यांनी चौकीदाराला पत्र लिहून भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मरिना यांनी आतापर्यंत लग्न केलेले नाही. ह्यूमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुर पेजवर चौकीदारांनी हा पूर्ण किस्सा लिहिला आहे. ते पोस्टमध्ये सांगतात, मरिनाला ते पहिल्यांदा भेटले तेव्हा ३० वर्षांचे होते. मरिना वाळवंटात भटकंतीसाठी आल्या होत्या. पाच दिवसांच्या प्रवासात मरिना यांना चौकीदारांनी उंटाची स्वारी शिकवली होती. त्यावेळी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
ऑस्ट्रेलियाला परतण्यापूर्वी मरिना यांनी चौकीदारांना आय लव्ह यू हे तीन जादूई शब्द सांगितले. हे ऐकून ते लाजलो. परंतु आपल्या भावना ते व्यक्त करू शकले नाहीत. पण मरिना यांना भावना समजल्या होत्या. मरिना यांना भेटण्यासाठी ३० हजार रुपये उधार घेऊन ते मेलबर्नला गेले होते. परंतु लग्नानंतर मेलबर्नमध्येच स्थायिक व्हावे ही मरिना यांची इच्छा चौकीदारांना मान्य नव्हती.
हे संबंध त्याच वळणावर संपुष्टात आले होते. ते भारतात परतले आणि वैवाहिक आयुष्य सुरू केले. चौकीदारांना एका महिन्यापूर्वी एक पत्र मिळाले. तेव्हा त्यांच्या आनंदाला उधाण आले. पत्र वाचून मी खूप रोमांचित झालो आहे. रामाची शप्पथ..! मी पुन्हा २१ वर्षांचा झालो आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. चौकीदारांचे दोन विवाहित मुले आहेत. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे.
(फोटो साभार – ह्युमन्स ऑफ बॉम्बे)