सेम्बकॉर्प एनर्जी इंडिया लिमिटेड (एसईआयएल), ही सेम्बकॉर्प उद्योग संचलित उपकंपनी आहे. कंपनीने ८०० मेगावाॅट क्षमतेचे पवनऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्याचे जाहीर केल्याचे यामुळे भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता १७३० मेगावाॅटपर्यंत पोहोचली आहे. ३०० मेगावाॅट क्षमतेचे पवनऊर्जा प्रकल्प पूर्ण करणारी सेम्बकॉर्प ही भारतीय सौरऊर्जा महामंडळाने घेतलेल्या लिलावप्रक्रियेतील पहिली स्वतंत्र ऊर्जा कंपनी ठरली आहे. एकत्रितपणे, यामुळे सहा लाख घरांना प्रकाश मिळणार आहे आणि कार्बन उत्सर्जनात प्रतिवर्ष दोन दशलक्ष टनांची कपात होणार आहे. एसईसीआय लिलावप्रक्रियेतील ही सर्वांत मोठी कार्यक्षम पवनऊर्जा आहे.
सिंग यांनी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामाच्या वचनबद्धतेबद्दल एसईएल आणि सिंगापूर सरकारचे अभिनंदन केले. ते म्हणाले, ऊर्जा क्षेत्रात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सर्वांना समान संधी देऊन ऊर्जा परिवर्तन घडवून आणण्यासाठी दृढनिश्चयी आहोत. ते पुढे म्हणाले, २०२० पर्यंत नवीकरणीय ऊर्जेचे १७५ गिगावाॅटचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि पंतप्रधानांचे २०३० पर्यंत ४५० गिगावाॅट नवीकरणीय ऊर्जेचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सेम्बकॉर्पचे समूह अध्यक्ष आणि सीईओ, वोन्ग किम यीन याप्रसंगी म्हणाले, सेम्बकॉर्पच्या ऊर्जा व्यवहारातील भारत प्रमुख बाजारपेठ आहे. आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाठी भारत सरकारचे आभारी आहोत आणि आम्ही यापुढेही भारतातील नागरीकरण, विद्युतीकरण आणि डिकार्बनायजेशनसाठी पाठिंबा देऊ.