मालेगाव – जमिनीचा सातबारा देण्यासाठी तब्बल १७ हजार २५० रुपयांची मागणी करणारा तलाठी शरीफ गणी शेख याच्याविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. सातबारा उताऱ्यावर औद्योगिक वापर अशी नोंद करुन सातबारा देण्यासाठी शेख याने १७ हजार २५० रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने सापळा रचला. या पथकातील सदस्यांच्या उपस्थितीत शेख याने लाचेची मागणी केली. त्यामुळे पथकाने शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एसीबीकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, लाच मागणे हा गुन्हा आहे. यासंदर्भात कुणाला तक्रार द्यायची असल्यास १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीचे पोलिस उपअधिक्षक दिनकर पिंगळे यांनी केले आहे.