नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ७ हजार ७९८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत ४३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २१३, चांदवड २४, सिन्नर १२४, दिंडोरी ४५, निफाड १७०, देवळा १६, नांदगांव ७२, येवला ३६, त्र्यंबकेश्वर १५, सुरगाणा १५, पेठ ०३, कळवण ०१, बागलाण ३२, इगतपुरी १५१, मालेगांव ग्रामीण ४८ असे एकूण ९६५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ६७५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९१ तर जिल्ह्याबाहेरील ०७ असे एकूण २ हजार ७३८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १० हजार ९६९ रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यु : नाशिक ग्रामीण १००, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २३०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८४ व जिल्हा बाहेरील १९ अशा एकूण ४३३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १० हजार ९६९ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७ हजार ७९८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २ हजार ७३८ पॉझिटिव्ह रुग्ण.
(वरील आकडेवारी २४ जुलै सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)