नवी दिल्ली – आजकाल स्मार्टफोनचा फोटोग्राफीसाठी खूपच उपयोग केला जातो. स्मार्टफोन हातात येताच कोणीही प्रथम त्याचा कॅमेरा तपासतो. त्यामुळे आपणास नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि फोटोग्राफीचीही आवड असेल तर अशा कॅमेराची उत्कृष्ट गुणवत्ता असलेला स्मार्टफोन बघा.
सध्या बाजारात आपल्या बजेटच्या श्रेणीत चांगले कॅमेरे असलेले स्मार्टफोन देखील आहेत. ज्याची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यामध्ये ६४ मेगापिक्सेल (एमपी)चा प्राथमिक सेन्सर देण्यात आला आहे. अशा स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊ या…
रेडमी नोट ९ प्रो मॅक्स
या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे आणि त्याचा प्राथमिक सेन्सर ६४ एमपी आहे. याशिवाय फोनमध्ये अल्ट्रा वाइड सेन्सर, मॅक्रो मोड, सुपर मॅक्रो, पोर्ट्रेट, एचडीआर, नाईट मोड, स्लो मोसल अशी कॅमेरा फीचर्सही देण्यात आली आहेत. जे फोटोग्राफीचा अनुभव चांगला बनवतात. यात पावर बॅकअपसाठी ३२ एमपी फ्रंट कॅमेरा आणि ५०२० एमएएच बॅटरी आहे. याची किंमत १४,९९९ रुपये इतकी आहे.
रियलमी ७
हा स्मार्टफोन उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव देण्यास देखील सक्षम आहे. यात ६४ एमपी क्वाड रीअर कॅमेरा सेटअप आहे. याफोनचा फ्रंट कॅमेरा १६ एमपीचा असून यात ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे आणि मीडियाटेक हेलिओ जी ९५ प्रोसेसरवर कार्य करतो. रियलमी ७ची किंमत: १४,९९९ रुपये
इतकी आहे.
टेकनो कॅमन १६
टेकनो कॅमन १६ स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि त्याचा मुख्य सेन्सर ६४ एमपी आहे. तर सेल्फीसाठी वापरकर्त्यांना १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि मीडियाटेक हेलिओ जी ७० प्रोसेसर आहे. याची किंमत: ११,४९९ रुपये आहे.









