नाशिक – रामकुंड येथील गोदावरी नदी पात्रात जिवंत जलस्त्रोत तब्बल १९ वर्षांनंतरही जिवंत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नदीतील कुंडाच्या कॉंक्रीटीकरणखाली मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याचा पुरावा मिळाल्याची माहिती नदीप्रेमी देवांग जानी यांनी दिली आहे. रामकुंड जवळील ट्रायल बोअरमध्ये सबमर्सिबल पंप टाकून नाशिक स्मार्ट सिटी तर्फे भूगर्भातील पाण्याची मात्रा मोजण्यात आली. त्यात सरासरी १ मिनिटाला ४० लिटर पाणी बाहेर पडते आहे. २ तासांनी पाण्याच्या वेग वाढला. एकूण ३.५ तास सलगपणे मोटर सुरू होती. यावरून हे दिसून येते की ४.९ मिनिटात २०० लिटर पाणी निघते आहे, अशी माहिती जानी यांनी दिली आहे.