कळवण -.गेल्या ४० वर्षांपासून ओतूर धरण असून नसल्यासारखे आहे त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत ओतूर धरण व पाणी प्रश्नाचा विषय चर्चेत येतो. नुकत्याच जाहिर झालेल्या अर्थसंकल्पात ओतूर धरणासाठी ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे ओतूर परिसरातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या असून कळवण बाजार समिती आवारात शेतकरी बांधवानी फटाक्यांची अतिशबाजी करुन पेढे वाटून जल्लोषात अर्थसंकल्प तरतुदीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी छोटेखानी सभा होऊन सभेत शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेसचे गटनेते यशवंत गवळी यांनी मनोगत व्यक्त केले व ओतूर परिसरातील गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित ओतूर धरणाचा प्रश्न सोडविण्यात आमदार नितीन पवार यांचे प्रयत्न यशस्वी झाल्याबद्दल व अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे अभिनंदन करणारा ठराव यावेळी करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार, शेतकरी नेते देविदास पवार, यशवंत गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, विजय शिरसाठ,जगन साबळे, मांवजी गायकवाड, अतुल देवरे, विलास रौदळ, दिगंबर पवार, संदीप वाघ,सपना पगार, राजू पवार,चेतन बिरार, अनिल घोडेस्वार,रविकांत सोनवणे, पोपट शिंदे, ललित मोरे, भाऊसाहेब मोरे, युवराज मोरे,बबन मोरे,बाळू मोरे,कडू शिंदे, सुभाष देवरे,दिपक आहेर, सुनिल देवरे, समाधान देवरे, नामदेव खैरनार,हिरामन वाघ, भाऊसाहेब शिंदे, दिपक वाघ, कमलाकर निकम, पंकज वाघ, सुनिल वाघ,सोनू वाघ, रंगनाथ काळे,शहाबन पठाण, देवा भुजाडे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन विलास रौदळ यांनी केले.