शिकागो – भारतीय वंशाचा नागरिक आदित्य सिंगला कोरोना विषाणूमुळे विमानाने प्रवास करायला इतकी भीती वाटली होती की तो तीन महिने शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर लपून राहिला. युनायटेड एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी ओळखपत्र मागितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. अखेर अमेरिकन पोलीसांनी ३६ वर्षीय तरूणाला अटक केली. त्याने एक ओळखपत्र दाखविले असून ते ऑपरेशन मॅनेजरचे होते. मात्र गेल्या ऑक्टोबरपासून तो बेपत्ता होता. त्याला अटक करण्यात आली असून लास एन्जेलिस उपनगरात आदित्य सिंह राहत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सिंग यांच्यावर प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ ऑक्टोबरला आदित्यसिंग लास एन्जेलिसच्या विमानाने ओहरे येथे आला होता आणि विमानतळाच्या सुरक्षा क्षेत्रात लपला होता, असे कोर्टाने सांगितले.