नवी दिल्ली – मोठ्या घरांमध्ये मोठा टीव्ही हवा यासाठी सर्वच उत्सुक असतात. स्पीकरच्या किमतीत जर टीव्ही मिळत असेल तर सोन्याहूनही पिवळं. अँमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची अनोखी संधी चालून आली आहे. केवळ ३२३२ रुपयांत भारतीय टीव्ही कंपनीने ही ऑफर सुरु केली आहे. भारतीय टीव्ही ब्रँड शिन्कोने टीव्ही विक्रीसाठी एक खास ऑफर जाहीर केली असून त्याअंतर्गत कंपनीचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही अवघ्या ३२३२ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या टीव्हीचा मॉडेल नंबर SO328AS आहे, याची विक्री आज (१८ ऑक्टोबर) सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. शिन्कोच्या या ३२इंच स्मार्ट टीव्हीला अँड्रॉइड ८ सपोर्ट आहे. याशिवाय ग्रेड पॅनेल, एचआरडीपी डिस्प्ले, १ जीबी रॅम आणि ८ जीबी स्टोरेज आहे. या टीव्हीमध्ये २० वॅटचे स्पीकर आणि ब्लूटूथसुद्धा आहे. यात ३ एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्टसह ए ५३ क्वाडकोर प्रोसेसर आहे.
Yes