पुणे/नाशिक – राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांची सवलत दिली आहे. त्याची मुदत येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच आहे. मात्र, या सवलतीचा लाभ ३ डिसेंबरनंतर ४ महिन्यांपर्यंत घेता येणार आहे. त्यासाठी संबंधितांनी ३० डिसेंबरपूर्वी नोंदणी करुन शुल्क भरावे. त्यानंतर ४ महिन्यापर्यंत त्याची वैधता राहणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक बघा