नवी दिल्ली – या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये भारतातील पेट्रोलचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर त्याची किंमत १०० रुपयांच्या वर गेली आहे. तथापि, भारताच्या शेजारी देशांसह जगात असे अनेक देश आहेत, जेथे पेट्रोलची किंमत फक्त २, ४ किंवा १० रुपये प्रति लीटर आहे.
हे देश कोणते ते जाणून घेऊ या…
१) किंमत अवघे दीड रुपये
जगभरातील देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत दाखवणारी वेबसाईट ग्लोबल पेट्रोलप्राइस डॉट यांच्या म्हणण्यानुसार, लॅटिन अमेरिकेतील देश व्हेनेझुएलामध्ये २२ फेब्रुवारी रोजी भारतीय चलनानुसार पेट्रोलची किंमत १ रुपया ४५ पैसे इतकी होती.
२) ४ रुपये प्रति लिटर
स्वस्त पेट्रोल विक्रीच्या बाबतीत व्हेनेझुएला नंतर इराणचा नंबर येतो. इराणमध्ये पेट्रोलची किंमत ४ रुपये ३९ पैसे आहे. इराणनंतर अंगोला हा देश असा आहे, जिथे पेट्रोल १७.७७ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.
३) स्वस्त पेट्रोल असलेले अन्य देश
व्हेनेझुएला नंतर इराणच्या पाठोपाठ अल्जीरिया (२५.०३२ रुपये), कुवैत (२५.१३३ रुपये), सुदान (२७.४०७ रुपये), कझाकस्तान (२९.६५७ रुपये), कतार (२९.८२५ रुपये), तुर्कमेनिस्तान (३१.०८४ रुपये), नायजेरिया (३१.५६८ रुपये) आहेत.
४) शेजारच्या देशांमध्ये
भारताच्या शेजारच्या देशांमध्येही स्वस्त पेट्रोल विकले जात आहे. आश्चर्य म्हणजे नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान सारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांचा या देशांमध्ये समावेश आहे. चीनमध्ये पेट्रोलची किंमत ७७.०२ रुपये आहे, पाकिस्तानमध्ये प्रतिलिटर ५१.११ रुपये, श्रीलंकेत पेट्रोल ६०.४५ रुपये, नेपाळमध्ये ६९.६५ रुपये आणि भूतानमध्ये ४९.५६ रुपये विकले जात आहेत.