भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर, सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांनी दिली माहिती
कळवण – ठाकरे आघाडी सरकारने ७५ लाख वीज ग्राहकांना, ४५ लाख शेतक-यांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप केले आहे.म्हणून ठाकरे आघाडी सरकारच्या निषेधार्थ शुक्रवार २४ फेब्रुवारी रोजी भाजपाने राज्यभर “जेल भरो व हल्लाबोल“ आंदोलन आयोजित केले आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष केंदा पाटील आहेर, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांनी दिली.
वीज ग्राहकांच्या मागण्या मान्य न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे. कोरोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिल वसूली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र, आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही.वीज पुरवठा खंडीत करण्यास येणाऱ्या महावितरण च्या कर्मचाऱ्यांना अटकावही करतील.१०० युनिटपर्यंत वीज मोफत द्या, लॉकडाऊन काळातील अवाजवी बिले दुरुस्त करून द्या आदी मागण्या आघाडी सरकारने मान्य न केल्यास २४ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल,असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा पाटील आहेर,जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार यांनी दिला.
२४ फेब्रुवारी रोजी कळवणला आंदोलन –
कळवण येथे २४ फेब्रुवारी रोजी कळवण बस स्थानकाजवळ भाजपा जिल्हाध्यक्ष केदा पाटील आहेर यांच्या नेतृत्वात खाली रास्ता रोको व जेल भरो आंदोलन होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरणार यांनी दिली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष दीपक खैरणार सुधाकर पगार निंबा पाटील विकास देशमुख गोविंद कोठावदे डॉ अनिल महाजन सुधाकर पगार सर विश्वास पाटील सौ. सोनाली जाधव माणिक देवरे कृशनकांत कामलसकर भूषण देसाई मोहन गांगुर्डे सचिन सोनवणे बाळू पगार राजेंद्र ठाकरे चेतन निकम मोहसीन कासार प्रल्हाद शिवदे भूषण शिरोरे आदी परिश्रम घेत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!