पिंपळगाव बसवंत – बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने पिंपळगाव बसवंत शहराला वीज पुरवठा करणा-या रानवड फिडरमध्ये बिघाड झाला होता. अखेर २४ तासानंतर गुरुवारी बिघाड दुरूस्त करण्यात महावितरण विभागाला यश आले.
बुधवारी पिंपळगाव बसवंत परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट मोठा असल्याने रानवडवरून पिंपळगावला येणार्या ३३ केव्ही लाईनवर पावसामुळे दोन ठिकाणी वीज पडली. त्यामुळे ४ पिन इन्सुलेटर खराब झाले होते. त्यानंतर पिंपळगावचे मुख्य अभियंता एकनाथ कापसे, उपअभियंता नितीन पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली २० कर्मचारी तत्काळ दुरुस्तीसाठी तैनात करण्यात आले होते. बिघाड मोठा असल्याने तात्पुरता पिंपळस फिडरवरून पिंपळगावला वीज पुरवठा करण्यात आला. मात्र, गुरुवारी सर्व दुरूस्ती करण्यात झाल्यानंतर रानवड फिडरमधून वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आल्याची माहिती उपअभियंता नितीन पगारे यांनी दिली.