धुळे – तब्बल २२ लाख रुपयांचा तंबाखूसह पान मसाला दोंडाईचा पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोंडाईचा पोलिसांनी दिल्लाया माहितीनुसार, नंदूरबार येथून धुळ्याकडे प्रतिबंधित असलेल्या पान मसाल्या सह सुगंधित तंबाखू ची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडितराव यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांना तात्काळ नंदुरबार रोडवर सापळा लावायला सांगितला. पोलिसांनी एमएच ३९ सी ९२२१ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी अडवले. या वाहनात तब्बल २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहन चालकासोबत असलेल्या व्यक्ती तसेच माल देणारा व माल घेणारा याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनासह सर्व माल पोलिसांच्या हाती लागला आहे. दोंडाईच्या पोलिसांच्या या कामगिरी निमित्त त्यांचे पोलिस अधिक्षकांनी अभिनंदन केले आहे.