नाशिक – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित कडून सदभाव (महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड ) कंपनीला देण्यात आलेले कंत्राट सेवा पुरवठादार म्हणून नेमणूक करण्यात आले महाराष्ट्र राज्यात बॉर्डर वर २२ ठिकाणी सदभाव कंपनी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड काम करते.
त्या ठिकाणी वाहनांचे पेपर स्कॅनिग, ओव्हर लोड चेकिंग, ऑनलाईन पद्धतीने वाहनांची तपासणी करणे. व त्याच बरोबर सदभाव कंपनीकडून वाहन चालकांना देण्यात येणाऱ्या सुविधा चालकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देणे,वाहन पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे, स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, हॉटेल सुविधा उपलब्ध करुन देणे,ATM सुविधा उपलब्ध करून देणे, अंबुलन्स असणे, क्रेन सुविधा उपलब्ध करून देणे, टायर पंक्चर सुविधा उपलब्ध करून देणे, डॉक्टर उपलब्ध करून देणे,मेडिकल शॉप उपलब्ध करून देणे, झेरॉक्स शॉप उपलब्ध करून देणे, मेकॅनी क उपलब्ध करून देणे, ऑटोमोबाईल सर्व्हिस उपलब्ध करून देणे या सर्व सुविधा चालकांना उपलब्ध करून देण्याच्या अटीशर्तिवर महाराष्ट्र शासनाने सद्भाव कंपनी महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट नेटवर्क लिमिटेड यांना कंत्राट दिले गेले. पण आजपर्यंत यातील बहुतांश सुविधा फक्त कागदावरच आहे. प्रतक्षात यातील बहुतांश सुविधा २२ चेकपोस्ट वर नाहीच आहे तरी पण सदभाव कंपनी वाहन चालकांकडून सेवाकर वाहनांच्या प्रकारानुसार आकारला जातो. ही वाहन चालकांची फसवणूक आहे.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या टीमने काही चेकपोस्ट वर सर्वे केले असता Sop प्रमाणे आम्हाला तिथे बहुतांश सुविधा उपलब्ध नाही असे आढळून आले आणि आम्ही तेथे नियुक्त असलेले परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक यांना हा सर्व प्रकार दाखवून हरकत नोंदविण्यास सांगितली. त्यावेळी नाशिक व धुळे अध्यक्ष सचिन जाधव, किशोर राजपूत किरण भालेकर, विनायक वाघ, अंजु सिंगल,महेश रघुवंशी,नरेश पवार, हरीश सिंगल, जगदीश संधु हे पदाधिकारी सर्वेसाठी चेकपोस्टवर गेले होते.
ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस आपल्या माध्यमातून सदभाव कंपनीला कळवीत आहे की जो पर्यंत SOP प्रमाणे सुविधा वाहन चालकांना देत नाही तोपर्यंत सेवाकर घेणे बंद करावे अन्यथा आम्हाला नाईलाज ने सर्व २२ चेकपोस्टवर आंदोलन करावे लागेल कृपया याची नोंद घ्यावी