नवी दिल्ली ः २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदाता देशाच्या कोणत्याही भागातून मतदान करू शकतील, अशी आशा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातील प्रकल्प येत्या दोन-तीन महिन्यांत सुरू होईल. या वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणूक आयोगाने आयआयटी मद्रास, इतर आयआयटी तसेच अनेक प्रमुख संस्थांच्या प्रतिष्ठित तंत्रज्ञांशी सल्लामसलत करून रिमोट वोटिंगला सक्षम बनवण्यासाठी एक संशोधन प्रकल्प सुरू केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून एक समर्पित पथक या परियोजनेला आकार देण्यासाठी कठोर मेहनत घेत आहे. २०२४ पर्यंत या प्रकल्पाला मूर्तरूप मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. इंटरनेटद्वारे मतदान करणे किंवा घरी मतदान करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदानप्रक्रियेत पारदर्शकता आणि गोपनीयता नेहमीच स्वतंत्र, निष्पक्ष आणि विश्वासार्ह मतदान करण्याचा हा एक मार्गदर्शक विचार आहे. आयोग लवकरच विविध पर्यायांचा विचार विनिमय करून मतदानाच्या मॉडेलला अंतिम रूप देणार आहे.
यात काही प्रतीकात्मक बदल होणार आहेत. राजकीय पक्ष आणि इतर हितचिंतकांसोबत व्यापक विचार विनिमय करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील ब्लॉकचेन तंत्रज्ञानाबद्दल निवडणूक आयोगाचे माजी वरिष्ठ उपआयुक्त संदीप सक्सेना यांनी माहिती दिली होती. मतदारांना या सुविधेचा वापर करण्यासाठी निर्धारित वेळेदरम्यान सूचित केलेल्या एका जागेवर जावे लागेल. मात्र, याचा अर्थ घरातूनच मतदान होईल, असे नाही.