वृश्चिक राशीवर शनीचा राहणार असा प्रभाव
अन्य राशी प्रमाणेच नक्षत्र बदल करीत असलेल्या शनीचा शुभाशुभ परिणाम वृश्चिक राशीवर पण होणार आहे. वृश्चिक राशीच्या तृतीय ठिकाणी शनी विराजमान असणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून लग्न व सप्तमात राहू तृतीय व चतुर्थ यावर गुरूचा प्रभाव अशा पद्धतीची ग्रहस्थिती मार्च २०२३ पर्यंत आहे. वृश्चिक राशीची नुकतीच संपलेली साडेसाती या संपूर्ण कार्यकाळात आलेले कडू-गोड अनुभव विसरून वृश्चिक राशी असलेल्यांनी पुढील योग्य नियोजन करून धडाडीने कामाला लागणे आवश्यक आहे. तृतीय मधला शनी मागील काळात आलेले वाईट अनुभव विसरण्यास सांगत असून लग्न ठिकाणी असलेला केतू हा सर्व प्रकारच्या जुन्या अनुभवांच्या शंकाकुशंका विसरून त्याचप्रमाणे गैरसमज विसरून भविष्यकाळासाठी ऊर्जावान बनवून कामाला लागण्याचे सुचित करत आहे. आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांचा पाढा आता यापुढे वाचत बसू नये तर नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणचे नवीन संधी गुरु प्रभावामुळे आपणास मिळणार आहेत. आपण शारीरिक व मानसिक रित्या खंबीर होणे गरजेचे आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ व शनी हे तितकेसे शत्रू ग्रह नाहीत. प्रसंगी परस्परांना पूरक भूमिका पार पाडतात. त्यामुळे नकारात्मक विचार विसरुन योग्य अनुभवी सल्लागारांच्या मदतीने पुढील वाटचाल केल्यास दाही दिशांना आपणास यश मिळू शकते. कुटुंबातील तसेच परिचित मधील नकारात्मक विचार असणाऱ्यांपासून दूर रहावे. ऐकावे जनाचे करावे मनाचे हे लक्षात ठेवावे. स्पष्ट बोलण्यापेक्षा गोड बोलून आपले काम साधावे. आपण निडर स्वभावाचे आहात. योग्य तिथेच स्वभावाचा वापर करावा. आपला स्वभाव आणि बोलण्याने कोणी महत्वाची व उपयोगी व्यक्ती नाराज होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपण सर्वांच्याच मदतीला धावून जातात, परंतु नंतर आपल्याला अडचणीमध्ये तेवढी मदत मिळत नाही याचे सुद्धा कॅल्क्युलेशन करावे. त्यांचा भविष्यात उपयोग होईल. अशाच लोकांच्या संपर्कात असावे. खर्चिक स्वभाव कमी करावा. गैरसमज करून घेणे टाळावे. एकावेळी एकाच कामात लक्ष गुंतवावे. दीर्घकालीन गुंतवणूक, दीर्घकालीन व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करावे.
असे मिळणार फळ
नोकरी व्यवसायात अपेक्षित बढती, आर्थिक संस्थांची कर्ज मंजुरी मिळेल, कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील, जन विरोध कमी होईल, सरकारी कामांना वेग येईल, मोठे मानसन्मान मिळतील, प्रगतीसाठी परदेशगमन योग, वास्तुविषयक व्यवहार होतील, उत्सव समारंभ होतील, कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होईल.
…
याच लेखमालेत उद्या पुढची रास बघू
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.