२०२१ – तुळ राशीवर राहणार शनीचा असा प्रभाव
अन्य राशी प्रमाणे तुळ राशीवर देखील शनीच्या श्रवण नक्षत्र प्रवेशाचा शुभाशुभ परिणाम जाणवणार आहे. तूळ राशीच्या चतुर्थ ठिकाणी शनी विराजमान राहणार आहे. त्याचठिकाणी गुरु देखील असणार आहे. या दोघांची सप्तम दृष्टी दशमावर असणार आहे. २०२१ या वर्षाचा मुलांक पाच आहे. त्याचा स्वामी बुध आहे. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम बघता तुळ राशीवाल्यांनी प्रॅक्टिकल होणे गरजेचे आहे. कल्पनाविश्वात रमणे सोडून देऊन शाश्वत फायदा देणारे विचार व कृती आत्मसात केल्यास लाभ होईल.
रागामध्ये तसेच तडकाफडकी पूर्ण विचारांती न घेतलेल्या निर्णयामुळे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. अनुभव नसलेल्या सल्लागारामुळे शॉर्ट टर्म फायदा तर दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. संख्यात्मक पेक्षा गुणात्मक जनसंपर्क ठेवल्यास फायदा होईल. तूळ राशीच्या व्यक्ती धोरणात्मक क्रियात्मक तसेच आत्मसात करण्याबाबत अतिशय प्रगल्भ असतात. परंतु अतिआत्मविश्वासामुळे आपले लॉजिक तितकेच प्रगल्भ ठरावे यावर काम झाले पाहिजे.
डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. गुणात्मक परिचय ठेवावा. विद्यार्थ्यांनी अती जागरण टाळावे. हाडासंबंधातील दुखण्याची काळजी घ्यावी. काल्पनिक पेक्षा व्यावहारीक स्तरावर विचारांची बैठक करावी. चतुर्थातील गुरु शुभ कार्य घडवेल. व्यवसायिक अनुभवी सल्ला मिळवावा म्हणजे व्यवसाय विस्तार होईल. परदेशगमन योग. काही ठिकाणचा खर्च हा इन्व्हेस्टमेंट म्हणून बघावा. महिला वर्गासाठी वस्त्रप्रावरणे, फॅशन डिझायनिंग, अन्नप्रक्रिया, इंटेरिअर डिझायनिंग, मॉडेलिंग, कॉस्मेटिक्स, व्यापार या क्षेत्रात अधिक प्रयत्न करावे. सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, एव्हिएशन, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, फळबागा, नियोजन या क्षेत्रात विशेष संधी उपलब्ध होतील असे ग्रहमान आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
https://indiadarpanlive.com/?cat=22