कन्या राशीवर राहणार शनीचा असा प्रभाव
अन्य राशीप्रमाणे कन्या राशीवर देखील शनीच्या श्रवण या नक्षत्र बदलाचा शुभाशुभ प्रभाव जाणवणार आहे. कन्या राशीचा स्वामी बुध असून पंचम भावामध्ये शनी विराजमान आहे. त्यासोबतच पाचवा गुरु त्याच ठिकाणी आहे. कन्या राशीवाल्यांनी या वर्षात विविध प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये मुख्यतः मागील चुकांची पुनरावृत्ती टाळणे, टीकाकारांचे स्वागत करणे, व्यावहारिक निर्णय योग्य तो आर्थिक ताळेबंद मांडून घेणे, भावनेच्या आहारी जाऊन मोठी गुंतवणूक, मोठ्या स्वरूपाचे कर्ज घेऊ नये, परताव्याचा योग्य तो अभ्यास करूनच दीर्घकालीन गुंतवणूक करावी, कुणाला सल्ला देताना देखील याच पद्धतीचा अभ्यास करून द्यावा, मौल्यवान वस्तू सांभाळणे गरजेचे आहे, समाजात दिखाव्यासाठी स्टेटस राखण्यासाठी मोठा व नियमित होणारा अनावश्यक खर्च टाळावा, पंचमात गुरू, शनी युतीमुळे विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. चुकीच्या सवयी प्रयत्नपूर्वक टाळाव्यात. अनावश्यक खरेदी टाळावी लागणार आहे.
असा देणार शनी शुभ फळ
या वर्षभरात वरील प्रकारची सावधानता बाळगली तर बऱ्याच अंशी जीवन सुखकर होणार आहे. जुनी दुखणी या काळात डोकं वर काढणार नाहीत. मित्रपरिवार योग्य तेथे मदत करेल. कुटुंबातील अडकलेली शुभकार्य घडतील. अडकलेली जुनी येणी येतील. सरकारी कामे मार्गी लागतील. अभ्यासपूर्ण प्रयत्नाने चुकीच्या सवयी सुटतील. छोटे व्यवसाय यशदायी ठरतील. अल्पकालीन गुंतवणूक ऐनवेळी साथ देईल.
..
याच लेखमालेत उद्या आपण शेवटची रास बघू..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.