भोपाळ – रेल्वे प्रवाशांसाठी २०२१ हे वर्ष समाधानकारक असणार आहे. कारण सुमारे २०० मेल व एक्सप्रेस गाड्यांमध्ये २५ हजार बर्थ वाढतील. त्यामुळे अनेक प्रवासी आरामात प्रवास करू शकतील. नवीन योजनेनुसार डिसेंबर २०२१ पर्यंत हे कोच देशात ६८ रेल्वे विभागांच्या २०० हून अधिक गाड्यांमध्ये बसविण्यात येतील. या गाड्या सध्या जुन्या डिझाईन कोचसह चालू आहेत.
एका कोचची लांबी २३ मीटर आहे. सुमारे २४ डब्यांसह ट्रेनची सरासरी ११६० बर्थ आहे. अधुनिक सुविधांसह अधिक सुरक्षित व प्रगत तंत्रज्ञानाचे डबे गाड्यांमध्ये बदलण्यात आले आहेत. तसेच याची सुरुवातही झाली आहे. जर्मन कंपनी लिंक हॉफमन बुश (एलएचबी) च्या तांत्रिक सहकार्याने कपूरथला, रायबरेली आणि चेन्नई येथील कोच कारखान्यांमध्ये असे कोच तयार केले जात आहेत.
कोच तयार करण्याचे काम सुरू
नवीन एलएचबी कोच तयार करण्याची परवानगी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) लखनऊ यांनी दिली आहे. त्याअंतर्गत रेल्वेने सर्व कारखान्यांमध्ये २४ मीटर लांबीचे कोच तयार करण्याचे काम सुरू केले. प्रीमियम क्लास गाड्या यापूर्वीच एलएचबी कोच चालवतात. नवीन कोच सर्व रेल्वे ब्लॉकमध्ये सुलभपणे धावण्यास सक्षम आहेत.
एलएचबी कोच
नवीन कोच हे वैशिष्ट्यपूर्ण आहे . त्यात सेंटर बफर कपलर्स आहेत. अपघाताच्या वेळी ते एकमेकांवर आदळत नाहीत, त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता कमी होते. तसेच २०० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम असून आवाजही कमी आहे. अपघात झाल्यास प्रवाशांना कमी दुखापत होईल.