नवी दिल्ली – भारतीय पोलीस दलातील मराठी भाषिक असलेले वरिष्ठ अधिकारी शैलेंद्र मिश्रा यांना चक्क दहा भाषा बोलता येतात, त्यामुळे ते अगदी दहशतवाद्याला देखील काश्मिरीमध्ये (त्यांच्या बोली भाषेत) समजावत व गोड बोलून त्याला शरण जाण्यासाठी सहजपणे पटवून देतात. .
जम्मू-काश्मीर केडरचे आयपीएस शैलेंद्र मिश्रा यांना दहा भाषांचे ज्ञान असल्याने ते भारतात वेगवेगळ्या प्रांतात काम करताना या भाषा वापरुन ते बर्याच अडचणी सहज सोडवतात. काश्मीरमध्ये बोलताना ते काश्मिरी बोलतात. विशेष म्हणजे ते मुळ मराठी भाषिक असूनही त्यांनी काश्मीरमधील लोकांमध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. काश्मिरातील सामान्य जनता त्याच्यावर विश्वास ठेवते.तेथील लोक ज्या भाषेत बोलतात, त्याच भाषेत ते उत्तर देतात. ते देशातील पहिले आयपीएस आहेत की, त्यांना अनेक भाषांचे ज्ञान आहे. त्यांनी आपल्या भाषेच्या ज्ञानाचा उपयोग अनेक मोठ्या प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी केला आहे. एकदा शोपियांमध्ये चकमकी झाल्यावर त्यांनी दहशतवाद्याला त्याच्या भाषेत बोलून शरण जाण्यास सांगितले गेले.
2009 बॅचचे आयपीएस शैलेंद्र मिश्रा सध्या कठुआ जिल्ह्यात एसएसपी म्हणून कार्यरत आहेत. मुळचे महाराष्ट्रातील असलेले शैलेंद्र यांना इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, काश्मिरी, भोजपुरी, गुजराती, पंजाबी आणि डोगरी भाषा बोलता येतात. यावर्षी लॉकडाऊन दरम्यान कठुआतील चिनाब मिल येथे मोठी खळबळ उडाली होती. शेकडो कर्मचारी रस्त्यावर आले. संतप्त लोकांनी बंद पुकारून महामार्गावर धरणे सुरू केले . मोठी वाहतूक कोंडी झाली. पण पोलिसांना या जमावाला नियंत्रित करता आले नाही. अखेर शैलेंद्र मिश्रा घटनास्थळी पोहोचले. ते कर्मचारी बिहारचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर ते पोलिसांच्या गाडीवर चढले आणि त्यांनी त्या लोकांना भोजपुरीत समजावून सांगितले. कर्मचार्यांनी ते पाहून सहमती दर्शविली आणि रस्ता मोकळा केला.