नवी दिल्ली – देशभरात फास्ट टॅगच्या वापराविषयी सरकार सक्रिय असल्याचे दिसून आले. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसुली करण्यासाठी फास्ट टॅग फायदेशीर ठरते आहे. याच अनुषंगाने १ जानेवारी २०२१ पासून जुन्या व नव्या अशा सर्व कारसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंडळ आणि राजमार्ग मंत्रालयाने याबाबत याबाबत निर्देश दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्देशानुसार जुन्या व नव्या कारद्वारे फास्टटॅग पद्धतीने टोल वसुली केली जाणार आहे.
जुन्या वाहनांसाठी देखील अनिवार्य
१ जानेवारी २०१७ पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले. मंत्रालयातर्फे देखील फास्ट टॅगच्या वापरावर भर दिला जात होता. त्यानुसार २०१७ पासून येणाऱ्या नव्या वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. आता नवीन वाहनांसोबतच जुन्या वाहनांवर फास्ट टॅग स्टिकर अनिवार्य करण्यात आले आहे. प्रामुख्याने M आणि N प्रकारच्या वाहनांवर फास्ट टॅग स्टिकर सक्तीचे करण्यात आले आहे.
फास्ट टॅग शिवाय इन्शुरन्स नाही
सध्या कारचे इन्शुरन्स करतेवेळी फास्ट टॅग स्टिकर विषयी विचारणा केली जाते. परिवहन मंडळाने आधीच स्पष्ट केले आहे की, कारचे इन्शुरन्स करतेवेळी फास्ट टॅग स्टिकर अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार आता नव्याने इन्शुरन्स करण्यासाठी किंवा इन्शुरन्स रिनिव्ह करण्यासाठी फास्ट टॅग स्टिकर अनिवार्य करण्यात आले आहे. जर आपल्या वाहनांवर फास्ट टॅग स्टिकर नसेल तर कारचा इन्शुरन्स करता येणार नाही.