नवी दिल्ली – नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन किंवा जुनी कर प्रणाली निवडण्यासाठी उत्पन्न घोषणेचा फॉर्म आपल्या कार्यालयातील किंवा कंपनीतील एचआरकडून मिळवावा लागेल. कारण प्राप्तिकर कायद्याच्या कलम १११ बीएसी अंतर्गत, आर्थिक वर्ष म्हणजेच १ एप्रिल संपण्यापूर्वी करदात्यांना टीडीएस कपातीशी संबंधित कर प्रणाली निवडावी लागणार आहे.
आपणास २०२०-२१ पर्यंत, जुनी आणि नवीन कर प्रणाली निवडण्याचा एक पर्याय असून जुन्या प्रणालीमध्ये कलम सी, आणि डी, आयकर कायद्याचे एचआरए यासह अनेक सूट आहेत. मात्र नवीन प्रणालीला ही सूट दिली जाणार नाही. यामध्ये केवळ ८० सीसीडी (२) म्हणजे कर्मचारी योगदानावर सूट मिळवू शकतो. तर नवीन सिस्टममध्ये कराचे दर कमी आहेत.
करप्रणाली (जुनी किंवा नवीन ) निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा…
-
पगारदार किंवा निवृत्तीवेतनधारक ज्यास व्यवसायातून कोणतेही उत्पन्न नाही, दरवर्षी नवीन किंवा जुन्या कर प्रणालीत एक निवडू शकतो.
-
उत्पन्नाचा स्त्रोत जर व्यवसाय असेल तर नवीन प्रणाली निवडल्यानंतर आपण जुन्या कर प्रणालीवर फक्त एकदाच परत येऊ शकता.
-
ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना कोणत्याही व्यवस्थेनुसार कर भरावा लागत नाही.
-
नव्या यंत्रणेत ज्येष्ठ नागरिकांना जास्त करात सूट मिळत नाही. सर्वांसाठी सूट मर्यादा केवळ अडीच लाख रुपये आहे.
-
करदात्यांनी काळजीपूर्वक नवीन आणि जुने स्लॅब निवडले पाहिजेत. जर आपले वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असेल तर आपण कोणताही स्लॅब निवडू शकता.
-
जर एखादा करदाता एखाद्या आर्थिक वर्षात अडीच लाखाहून अधिक रुपयांच्या सुटचा दावा करत असेल तर त्याच्यासाठी जुनी व्यवस्था अधिक चांगली आहे. तसेच नवीन प्रणाली निवडणे फायद्याचे ठरणार नाही.