नवी दिल्ली – येत्या १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार असून या नव्या वर्षात अनेक बदल घडणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये बचत खाते असलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ग्राहकांना १ एप्रिलपासून रोकड जमा करणे, रोख रक्कम काढणे आणि आधार सक्षम पेमेंट सिस्टम व्यवहारांवर अधिक शुल्क आकारण्यात येणार आहे.
आयपीबीने दिलेल्या माहितीनुसार, सदर शुल्क फक्त पैसे काढणे आणि जमा करण्यावर आकारण्यात येणार आहे. तसेच फ्री शुल्काची मर्यादा संपल्यानंतर चार्ज आकारला जाईल. शुल्क व्यवहार दोन पद्धतींवर आधारित आहे.
रोख व्यवहार आणि एईपीएस व्यवहार. नियोजित व्यवहार एका महिन्यात विनामूल्य असतो. तर एका महिन्यात एका विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा पैसे काढणे शुल्क आकारले जाईल.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत आपले बचत खाते असेल तर दरमहा ४ वेळा विनामूल्य पैसे काढता येतात. त्यानंतर प्रत्येक व्यवहारावर कमीतकमी २५ रुपये किंवा एकूण मूल्याच्या अर्धा टक्के कपात केली जाते. बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
बचत किंवा चालू खाते असेल तर एका महिन्यात २५ हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम काढणे विनामूल्य आहे. यानंतर एकूण मूल्याच्या अर्धा टक्के किंवा प्रत्येक व्यवहारासाठी किमान २५ रुपये शुल्क आकारले जाईल.
सेव्हिंग आणि चालू खाते असेल तर प्रत्येक महिन्यामध्ये १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करणे विनामुल्य आहे. यानंतर एकूण मूल्याच्या अर्धा टक्के किंवा प्रत्येक व्यवहारासाठी किमान २५ रुपये शुल्क आकारले जाईल.
तसेच विनामूल्य मर्यादा पूर्ण झाल्यानंतर, सर्व व्यवहार रोख जमा करण्यासाठी २० रुपये, पैसे काढतानाही व्यवहार शुल्क २० रुपये आहे. मिनी स्टेटमेंट घेण्याचे शुल्क ५ रुपये आहे.