मुंबई – नव्या वर्षात पदार्पण होताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर माहोल तयार होऊ लागला आहे. वर्षाच्या पहिल्या महिन्यातच विविध ओटीटी अॅपवर एकाचवेळी दमदार चित्रपट व वेबसिरीज रिलीज होण्याच्या तयारीत आहेत.
१५ जानेवारीला अमेझॉन प्राईम व्हीडीयोवरील बहुप्रतिक्षित वेब सिरीज लॉन्च होणार आहे. त्याचवेळी नेटफ्लिक्सवर त्रिभंगा नावाचा सिनेमा रिलीज होईल. हे चित्रपट तसेच या वेब सिरीजसोबत अनेक दिग्गज कलावंतांची नावे जुळलेली आहेत. सलमान खान, बोनी कपूर, प्रियंका चोप्रा यांच्यासारखे दिग्गज कलावंत सामील आहेत. अमेझॉन प्राईम व्हिडीयोवर ‘तांडव’ ही वेब सिरीज सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केली आहे. त्यांनी सुल्तान, टायगर जिंदा है, भारत यासारखे गाजलेले चित्रपट केलेले आहेत. तांडवच्या माध्यमातूनच अली ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहेत. या सिरीजमध्ये सैफ अलीखान, डिम्पल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय सुनील ग्रोव्हर, मोहम्मद जीशन अय्यूब, तिग्मांशू धुलिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
नेटफ्लिक्सवर तिभंगा रिलीज होईल. त्यावेळी अजय देवगण ओटीटी प्लॅटफॉर्मवर निर्माता म्हणून पाऊल टाकतील. यात काजोलची मुख्य भूमिका असेल. त्रिभंगाचे ट्रेलर लॉन्च झाल्यावर सलमान, अक्षय आणि अभिषेक बच्चनसह अनेकांनी त्याचे कौतुक केले. त्याहीपूर्वी म्हणजे ७ जानेवारीला सलमान खान निर्मीत कागज हा सिनेमा झी वर रिलीज होत आहे. याचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले असून पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत आहे. २२ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रियंका चोपडा आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला व्हाईट टायगर रिलीज होत आहे. याशिवाय झी वर बोनी कपूर निर्मीत जीत की जिद ही वेब सिरीज लॉन्च होईल. यात अमृता पुरीची मुख्य भूमिका आहे.