मुंबई – इटालियन लक्झरी मोटरसायकल तयार करणारी कंपनी डुकाटी इंडियाने Multistrada 950 S ची बुकिंग भारतात सुरू केली आहे. बाईक बुक करण्यासाठी कंपनीच्या डीलरशिप किंवा अधिकृत वेबसाइटवरून १ लाख रुपये बुकिंग रक्कम भरता येणार आहे. २ नोव्हेंबर २०२० रोजी ही बाईक भारतात लॉन्च होणार आहे. नवीन डुकाटी Multistrada 950 S मध्ये, ९३७ सीसीचे एल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. इंजिनमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार नसल्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. सध्या १११ bhp पीक पॉवर आणि ९६NM टॉर्कची क्षमता आहे. यासह ट्रान्समिशन ड्युटीसाठी ६ स्पीड गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे. नवीन मॉडेलमध्ये बरेच नवे बदल होणार आहेत. परफॉर्मन्स, हँडलिंगच्या सोई नुसार गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले आहे, सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करू इच्छित नाही अशी माहिती डुकाटी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक बिपुल चंद्र यांनी दिली आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
अद्ययावत मॉडेलमध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल केले जातील असे कंपनीने स्पष्ट केले आहे.त्यात कास्ट अॅलोय किंवा स्पोक व्हील्स वापरले जाणार आहेत. इतर वैशिष्ट्यांमध्ये ५ इंचाचा फुल कलर टीएफटी डिस्प्ले, बॅकलिट हँडलबार कंट्रोल, हँड्सफ्री सिस्टमचे फीचर्स, राइडर नेव्हिगेशन, क्विक-शिफ्टर आणि क्रूझ कंट्रोलचा समावेश आहे.