नाशिक – ऊसतोड कामगाराचा मुलगा जेमतेम १२ वीचे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात पुण्याला जातो. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मेसमध्ये वेटर म्हणून काम करतो. पुढे विविध कंपन्यात काम करुन एक दिवस आपली कंपनी सुरु करतो. त्यानंतर अंबरनाथ, राजकोट येथे त्याचा विस्तार करतो. मुलांनाही उच्च शिक्षित करतो. ही संघर्षमय गोष्ट आहे. नाशिकच्या अंबड येथील एमआयडीसीमधील गोदावरी टेक्नीकल सर्व्हिसेसचे चेअरमन चंद्रकांत इप्पर यांची, १२ वीचा राहिलेला पेपर १७ वर्षानंतर कसा दिला त्यांचा हा त्यांचा गमंतीदार किस्साही ऐका..