मुंबई – इयत्ता १०वी व १२वीच्या परीक्षा यंदा होणारच आहेत. या परीक्षा ऑफलाईनच होतील, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी आज एक महत्त्वाची माहितीही दिली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने इयत्ता १०वी व १२वीची परीक्षा होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, या परीक्षा होणारच आहे. इयत्ता १०वीच्या परीक्षा येत्या २९ एप्रिल ते २१ मे या काळात तर इयत्ता १२वीच्या परीक्षा २३ एप्रिल ते २० मे या काळात होणार आहेत. ८० गुणांच्या या परीक्षेसाठी अर्धा तास वाढवून मिळणार आहे. तर, ४० ते ४५ गुणांच्या परीक्षेसाठी १५ मिनिटे वाढवून मिळणार असल्याचे गायकवाड यांनी आज घोषित केले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1373192770102333441
मंत्र्यांचे आदेश असे