नवी दिल्ली – कोरोना लॉकडाऊन आणि ऑनलाईन शिक्षणामुळे १०वी व १२वीच्या परीक्षा होणार का आणि झाल्या तरी नक्की केव्हा होणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. मात्र, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन बोर्डाच्या (सीबीएसई) परीक्षा ठरल्या कार्यक्रमाप्रमाणेच पार पडतील. तसेच, परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाईल, असे सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या पीरक्षांसदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. सीबीएसईने अद्याप परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. परीक्षांचे वेळापत्रक सीबीएसईचे आधिकृत संकेतस्थळ cbse.nic.in यावर उपलब्ध होऊ शकेल, असे त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे.