मुंबई – भारतीय तटरक्षक दलाने नाविक आणि यांत्रिक पदासाठी भरतीची घोषणा केलेली आहे. त्याअंतर्गत आता एकूण ३५८ पदांवर नियुक्ती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याकरिता ५ ते १९ जानेवारी या कालावधीत संधी उपलब्ध असेल. १९ जानेवारीला सायंकाळी ६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
www.joinindiancoastguard.in या संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. तटरक्षक दलाने एक अधिसूचना काढून या दोन्ही पदांसाठी सुरुवातीला एक लेखी परीक्षा देणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी व पडताळणी होईल. मात्र लेखी परीक्षा कधी होईल याबाबत कमालिची अनिश्चितता आहे. पण नियोजित वेळापत्रकानुसार मार्चमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे. आनलाईन परीक्षेचा निकाल २० दिवसांच्या आत घोषित करण्यात येईल. या पदांसाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय कमीत कमी १८ आणि जास्तीत जास्त २२ वर्षे असणे अनिवार्य आहे. तर नाविक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार १२ वी पास असावा व बारावीत गणीत व फिजीक्स हे विषय त्याच्या अभ्यासक्रमात असावे, असे अधिसूचनेत म्हटले आहे. तर यांत्रिक पदासाठी उमेदवार १००वी उत्तीर्ण असावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला २५० रुपये शुल्क द्यावे लागेल. अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीच्या उमेदवारांना शुल्क देण्याची आवश्यकता नसेल.