मुंबई – २०१३ साली रेल्वेत झालेला घोटाळा हा बॉलिवूडच्या चित्रपटातून प्रेरणा घेवून करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. एका चित्रपटात एक रुपयाच्या नोटेचे दोन भाग करून ते दोन वेगवेगळ्या व्यक्तींजवळ देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. नोटेचे हे दोन भाग जोडल्यानंतरच व्यवहार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटून मग डील पुढे नेली जायची असे त्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अगदी त्याच धर्तीवर रेल्वे विभागातील लाच घोताल्यामध्ये १० रुपयांच्या नोटांचा उपयोग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याचा होता हात
प्रवर्तन निदेशालय (ED) ला तपासादरम्यान असे माहिती झाले की दहा रुपयांच्या नगदी नोटांच्या माध्यमातूनच या घोटाळ्यातील सगळे व्यवहार होत असत. ई.डी. द्वारे दाखल करण्यात आलेल्या विशेष आरोपपत्रात असे सांगितले गेले आहे की घोटाळ्यात तत्कालीन रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांचा पुतण्या विजय सिंगला याचा हात होता. याशिवाय पश्चिम रेल्वेचे तत्कालीन महाव्यवस्थापक महेश कुमार आणि गैर सरकारी क्षेत्रातील अनेक लोकांची नावे या आरोपपत्रात घेतलेली आहेत.
नोटेचा असा होता वापर
१९७५ चे इंडियन रेल्वे सर्व्हिस इंजिनियर्स (आय.आर.एस.एस.ई.) असलेले महेश कुमार यांच्यासाठी लाचेचा प्रबंध करणाऱ्या साक्षीदाराच्या अनुसार ही लाच घेताना दहा रुपयांच्या नोटेचा वापर कोड म्हणून केला गेला होता. ई.डी. ने ही साक्ष २०१७ आणि २०१८ दरम्यान घेतली होती. २ मे २०१३ या दिवशी ५० लाख रुपयांच्या लाचेचा बंदोबस्त करायला सांगण्यात आला होता आणि त्यासाठी एक नंबर फोरवर्ड केला गेला. पैसे या नंबरवर उपस्थित असलेल्या व्यक्तीकडे द्यायचे होते. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी नोटेच्या नंबर चा उपयोग करण्यात आला होता.