वॉशिंग्टन – भारतात महिलेला दुर्गा देवीच्या रूपात मानले जाते, महिला मग कोणत्याही देशातील असो ती अबला नसून सबला असते. पुरूषांच्या बरोबरीने किंबहुना पुरूषांपेक्षा देखील जास्त कठीण काम ती करु शकते. असे म्हणतात की, जर एखाद्या महिलेला आव्हान दिले गेले तर ती कोणतीही कामे करू शकते आणि अमेरिकेच्या एका महिलेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. 28 वर्षीय मॅककेन्ना मेलर ही नऊ महिन्यांची गर्भवती असून तिन केवळ 5.25 मिनिटांत 1.6 किमी रंनींग (धावण्याची स्पर्धा ) पूर्ण केली.
या आगळ्यावेगळ्या घटनेची माहिती अशी की, या महिलेच्या नवऱ्यानेच तिला आव्हान दिलं होते की, जर ती गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात आठ मिनिटांत मैलभर धावत असेल तर तो म्हणजे तीचा नवरा तीला १०० डॉलर म्हणजे ७३०० रुपये देईल. त्या महिलेने केवळ पतीचे आव्हान स्वीकारले नाही तर ती दिलेल्या वेळेपेक्षा बरेच आधी स्पर्धा पूर्ण केली. या महिलेने ही शर्यत पाच मिनिट आणि 25 सेकंदात पूर्ण केली. 2018 मध्ये, त्यांनी एडिनबर्ग क्रॉस-कंट्री आंतरराष्ट्रीय आव्हानात अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. धावपटू वर्ल्डच्या म्हणण्यानुसार, एक सामान्य स्त्री दहा मिनिट आणि 40 सेकंदात हे अंतर पूर्ण करू शकते.