भोपाळ – शेतीचा व्यवसाय करतानाही लोकांकडे अनेक पर्याय आहेत. कोरोना काळाने तर याचा धडाच दिला. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात केवळझिरी गावातील शेतकरी जोगंद्र सिंह याने याचा उत्तम आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी पहिल्यांदा १५ एकर शेतात केळी लावून १८ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. एवढेच नाही तर पुढच्या पिकावर दिल्लीतील एका व्यापाऱ्याने १ कोटी रुपये गुंतवले आहेत. केळीची रोपं इतक्या सुरेख पद्धतीने लावण्यात आणि वाढविण्यात आली आहेत की आजा कृषी क्षेत्रातील जाणकार या प्रयोगाचा अभ्यास करण्याचा विचार करीत आहेत.
जोगेंद्र सुरुवातीला टोमॅटोची शेती करायचे मात्र त्याला चांगले भाव मिळत नव्हते. कोरोनाने लादलेल्या लॉकडाऊनमध्ये जगभरात निराशा होती तेव्हा त्यांनी केळीच्या पिकात प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. बुरहानपूरमध्ये राहणाऱ्या त्यांच्या काही नातेवाईकांनी सांगितले की लॉकडाऊनमुळे पाहिज्या त्या प्रमाणात केळी लावलेल्या नाहीत. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर केळांना चांगले भाव मिळू शकतील, असा अंदाज जोगेंद्र यांनी लावला. आणि पहिल्यांदाच केळीची रोपं लावण्याचे धाडस केले.
उद्योग विभागाचे सगायक संचालक नरेंद्र तोमर यांच्याकडून तांत्रिक बाजू समजून घेत जुलै २०२० मध्ये केळीची रोपं त्यांनी लावली. १५ एकर शेतात २५ हजार ५०० रोपं लावले. काही दिवसांपूर्वी जोगेंद्रने आपल्या शेतातील केळीच्या बागेचा एक सुंदर फोटो आणि व्हिडीयो ओळखीच्या व्यापाऱ्यांना पाठवले. तर त्यांनी प्रत्येक रोपातून ३० ते ३५ किलो फळं लागण्याचा अंदाज व्यक्त केला. जोगेंद्रने पिकाचे आनलाईन मुल्य एक कोटी १० लाख रुपये ठेवले. दिल्लीतील व्यापारी सतपाल सिंग यांनी 1 कोटी रुपये लावले आहेत. सतपाल २० वर्षांपासून याच व्यापारात आहेत.
रायसेन जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. स्वप्नील दुबे यांचे म्हणणे आहे की संशोधक आणि कृषी वैज्ञानिकांसह केवलझरीला जाऊन पिकाचा आढावा घेतला जाईल. रायसेन जिल्ह्यातील चिकणी माती आणि जलवायू केळीच्या पिकासाठी पोषक आहे. जोगेंद्रच्या प्रयोगावर संशोधन केले जाईल, असे ते म्हणाले.