नवी दिल्ली – सध्या भारतात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडलेले दिसत आहेत. त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य दुचाकी चालकांच्या खिशात पडत आहे. अनेक राज्यात पेट्रोलने तीन अंकी संख्या म्हणजेच १०० रुपये दरही ओलांडले आहेत. अशा परिस्थितीत नवीन बाइक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आता कोणती बाईक खरेदी करावी, याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता काही लोक दररोजच्या प्रवासासाठी कमीत कमी पेट्रोलमध्ये उत्तम मायलेज देऊ शकतात, अशा बाइकच्या शोधात आहेत. तुम्हाला जर अशी नवीन बाईक खरेदी करावीशी वाटत असेल तर भारतात अशा काही नवीन बाईक बाजारात आल्या आहेत.
यात बजाज सीटी १०० बाईक कमी किंमतीत सर्वोत्तम मायलेज देते. त्याबद्दल जाणून घेऊ या…
सीटी 100 मायलेज
बजाज कंपनीकडून बाजारात आलेली एंट्री लेव्हल बाईक सीटी 100 ही बाईक फक्त एक लिटर पेट्रोलमध्ये 95 किलोमीटरचा मायलेज देऊ शकते. ती किक स्टार्ट आणि सेल्फ मोड दोन्हीसह येते. त्यात 10 लिटर क्षमतेची इंधन टाकी आहे.
सीटी 100 या बाईकची शोरूम किंमत 44, 890 हजार रुपये आहे . त्याच्या सर्वात स्वस्त मॉडेलमध्ये तुम्हाला अॅलोय व्हील्ससह ड्रम ब्रेक आणि किक स्टार्ट दोन्ही चाकांवर मिळतील. महत्त्वाचे म्हणजे सीटी 100 हे भारतीय बाजारपेठेत काही वर्षांपासून ही बाईक उत्कृष्ट कामगिरीमुळे ग्राहकांची पसंतीला आली आहे.
बजाज सीटी 100 ही एक उत्तम बाइक आहे. या बाईकमध्ये 102 सीसी बीएस 6 कम्प्लियंट इंजिन असून 4 स्ट्रोकसह सिंगल सिलेंडरने सुसज्ज आहे. 7500 आरपीएम वर 7.7 एचपीची शक्ती आणि 5500 आरपीएम वर 8.24 एनएम टॉर्क जनरेट करते. या बाईकमध्ये 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे.