नाशिक – गोदावरी नदीतील पाणवेली काढण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे होळकर पूल ते रामवाडी पुलादरम्यान गोदावरी नदीचे पाणी नितळ दिसायला लागले आहे. गोदावरी नदीतील पाण्यावर वाढलेली पाणवेली, शेवाळे, तरंगत असलेले निर्माल्य, कचरा काढण्याच्या कामास सुरूवात झाली आहे.
नाशिक स्मार्ट सिटीने बनविलेल्या ट्रॅश स्किमरच्या सहाय्याने होळकर पूल ते आनंदवली पुला दरम्यान गोदावरी नदी स्वच्छ करण्यात येत आहे. पावसाळ्यामुळे बंद असलेले ट्रॅश स्किमरचे काम आता सुरू झाले आहे.
होळकर पूल ते रामवाडी पूल दरम्यान सध्या ट्रॅश स्किमर सुरू असून नदीवर मोठ्या प्रमाणात वाढलेली पाणवेली, पाण्यावर तरंगणारे शेवाळे इत्यादी गोष्टी मोठ्या प्रमाणावर साफ करण्यात आल्या असून, येथे नदीचे पात्र स्वच्छ झाल्यावर ट्रॅश स्किमरद्वारे पुढे आनंदवली पुलापर्यंत नदीची सफाई करण्यात येणार आहे. दररोज जवळपास 8 तास ट्रॅश स्किमरच्या सहाय्याने नदीच्या पाण्यावरील परिसर साफ करण्यात येत आहे. गोदावरी नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यापैकीच एक गोदावरी नदीच्या पाण्यावर वाढलेल्या पाणवेली काढण्याचे कामहत्त्वाचे काम ट्रॅश स्किमरच्या सहाय्याने करण्यात येत आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.