नवी दिल्ली – श्रीगणेशाचा प्रिय हत्ती याचे स्मरण करताना प्रतिष्ठा प्राप्त होते, असा समज आहे. शिवाय फेंग्शुईनेदेखील हत्तीचे महत्त्व स्वीकारत एक प्रभावी चिन्ह म्हणून महत्त्व अधोरेखित केले आहे. फेंग्शुईमध्ये हत्तीला प्रतिष्ठा, यश आणि सौभाग्याचे चिन्ह मानले जाते.
एवढेच नव्हे तर याचा संबंध इच्छाशक्ती, दीर्घायू, पुत्रप्राप्ती, बौद्धीक क्षमता आणि प्रतिष्ठा यांच्याशीही आहे. गणेशासोबत लक्ष्मीलाही हत्ती प्रीय आहे. त्यामुळे लक्ष्मी आणि गणेशाची कृपा असावी असे वाटत असेल तर घरात हत्ती कसा ठेवावा, हे जाणून घ्या…
ज्योतिषाचार्य सांगतात…
१. पुत्रप्राप्तीसाठी
हत्तीण आणि तिच्या पिल्लाचे स्टॅच्यू बेडरूममध्ये लावल्यास पूत्रप्राप्ती होते. त्यामुशे निःसंतान जोडप्याने हे अवश्य करतावे. फेंग्शुईमध्ये सात क्रमांकाला पुत्रप्राप्तीशी संबंधित मानले गेले आहे. त्यामुळे इच्छुकांनी सात हत्तींचा स्टॅच्यू बेडरूममध्ये ठेवावा.
२. शिक्षणासाठी
हे चिन्ह बौद्धीक क्षमता विकसित करण्यासाठीही उपयुक्त मानले जाते. त्यामुळे ते मुलांच्या बेडवर किंवा स्टडी टेबलवर ठेवायला हवे.
३. करिअरमध्ये स्थैर्य
हत्तीच्या वर बेडूक किंवा बंदराचा स्टॅच्यू ठेवणे करियरमध्ये स्थैर्य प्रदान करते. त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी ते ठेवता येईल.
४. सुरक्षेसाठी
फेंग्शुई हत्ती हा सुरक्षेच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा मानला जातो. एका हत्तीच्या मूर्तीला किंवा हत्तीच्या जोडप्याची मूर्ती प्रवेश दारावर ठेवायला हवे, जेणेकरून सुरक्षा प्रदान होण्यास मदत होते.
५. सौभाग्यासाठी
वरच्या दिशेने सोंड असलेला हत्ती प्रवेशद्वारावर लावला गेला तर तो समृद्धी, सौभाग्य आणि यश प्राप्तीसाठी उपयुक्त ठरतो. तसेच खालच्या दिशेने सोंड केलेला हत्ती दीर्घायुष्य प्रदान करतो.