नवी दिल्ली ः वाहनांच्या क्रमांकाप्रमाणे सोशल मिडीयावर युजरनेम सुद्धा व्हीआयपी होऊ लागले आहेत. असेक अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे असे क्रमांक आहेत. त्यांना अनेक प्रकारे धमकावून त्यांच्याकडून युजरनेम हिसकावण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करत आहेत. यात यशस्वी झाल्यानंतर त्या अकाउंटची ३०-३० लाख रुपयांमध्ये सोशल मीडियावर विक्री केली जात आहे. त्यांना थोपवण्यासाठी विविध सोशल मीडिया कंपन्यांनी ओजी युजरनेमना बंदी घातली आहे.
ओजी युजरनेम काय आहे
ओजी म्हणजे ओरिजनल गँगस्टर. अमेरिकेच्या रॅंप आणि हिपहॉप संस्कृतीतून हा शब्द आला आहे. एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात पहिल्यापासून आहे आणि तो त्यामधील सर्वज्ञानी आहे, अशा व्यक्तींसाठी या शब्दाचा उपयोग केला जातो. ओजी युजरनेम साधारण एकाच शब्दांपासू तयार होतात. त्यामुळेच ते सहजपणे ओळखले जाऊ शकतात. कोणत्याही सोशल मीडियावर नव्या युजरना ते सहज मिळू शकतं.
चोरण्याच्या कृप्त्या
सॉफ्टवेअर इंजिनिअर अजय पाँडिचेरी इन्स्टाग्रामचे सुरुवातीच्या युजरपैकी एक होते. त्यांचं युजरनेम होतं @ajay. अनेक लोकांनी त्यांना युजरनेम मागितलं. पण त्यांनी नकार दिला. २०१९ मध्ये त्यांना अचानक आपाला ईमेल आयडी लॉक झाल्याचं आढळलं. त्यासंबंधित फोन नंबरही कोणीतरी घेतला होता. सायबर गुन्हेगारांनी सिम स्वॅपवरून हे कृत्य केलं. अशा अनेक अकाउंटना हॅक करून सायबर गुन्हेगार विकत आहेत.