मुंबई – कोरोना लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देश ठप्प झाला होता. सर्व जण घरातच असल्याने सारेच अर्थचक्र मंदावले होते. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे या काळात तासाला ९० कोटी रुपये कमवत असल्याची बाब समोर आली आहे. भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये ते सलग नवव्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. हुरुन इंडिया दरवर्षी भारतातील श्रीमंतांची यादी प्रसिद्ध करते.
या यादीनुसार भारतातील पहिले १० श्रीमंत असे (व्यक्तीचे नाव आणि संपत्ती कोटी रुपयांमध्ये)
मुकेश अंबानी ६,५८,४००
हिंदुजा ब्रदर्स १,४३,७००
शिव नाडर १,४१,७००
गौतम अदानी १,४०,२००
अझीम प्रेमजी १,१४,४००
सायरस पूनावाला ९४,३००
आर.के. दमानी ८७,२००
उदय कोटक ८७,०००
दिलीप संघवी ८४,०००
पालोनजी ब्रदर्स ७६,०००